प्रतिनिधी: संकेश यादव

पुणे .लोहगाव परिसरातील कलवड वस्तीत टोळक्याने दहशत माजविल्याची घटना घडली आहे. टोळक्याने दोन रिक्षांवर दगडफेक केली. आरडाओरडा करुन हातातील कोयते हवेत फिरवून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दोन रिक्षांवर दगडफेक करून तोडफोड केली.

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करुन एका सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी १७ फेब्रुवारीला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास लोहगाव येथील कलवड वस्ती येथे घडली आहे.

याप्रकरणी अमोल अनंत कानु (वय-३९ रा. लेन नं. २ कलवड वस्ती, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून करण विजय दोरकर (वय-१९ रा. पठारे वस्ती, लोहगाव), शाबाद आयुब औटी (वय-१८ रा. मुंजाबा वस्ती, धानोरी), यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. तर करण दोरकर, शाबाद औटी यांना अटक केली आहे. करण दोरकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपींनी शनिवारी रात्री कलवड वस्ती येथे येऊन जुबेर कुठे राहतो, अशी विचारणा केली. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा आणि शिवीगाळ करुन हातातील लोखंडी कोयते उगारून दहशत माजविली. तसेच कोयत्याने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या दोन रिक्षांच्या समोरील काचा फोडल्या. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तोरडमल करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!