प्रतिनिधि: संकेश यादव

चाकन.जुन्या भांडणाचा राग मनात धरून आपल्याच मित्राचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून करून त्याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान, खून करणार्‍या दोन अल्पवयीन मुलांना चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रणव शंकर लोंढे (वय 17) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. चाकण-आंबेठाण रस्त्यालगत असणार्‍या सौंदर्य सोसायटी जवळच्या मोकळ्या जागेत प्रणवच्या दोन मित्रांनीच त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 26) सायंकाळी सात ते रात्री 12 च्या दरम्यान घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खून झालेला तरुण मेदनकरवाडीत राहवयास होता. आपल्या वडिलांचे निधन झाल्यानंतर सध्या आपल्या आईसह हंगा ( ता. पारनेर, जि. अहमदनगर) मामाच्या गावाला राहत होता.

तो मामाच्या गावाला राहत असूनही चाकण येथे आपल्या मित्रांकडे येत असायचा. दरम्यान, सोशल मीडियाच्या जमान्यात दहशत माजविण्याच्या हव्यासासाठी काही दिवसांपूर्वी प्रणवचा मित्र व प्रणव यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. मात्र हे मतभेद इतक्या टोकाला जातील याची पुसटशी कल्पना देखील प्रणवला नव्हती .

प्रणवचे अल्पवयीन मित्रांनी प्रणवला आंबेठाण रस्त्यावरील सौंदर्य सोसायटीच्या शेजारील मोकळ्या जागेत बोलावून घेऊन प्रणवच्या एका मित्राने प्रणवचा खून करताना तो व्हिडिओ

काढायला सांगितला तर एका मित्राने प्रणवच्या डोक्यात दगड टाकून त्याचा निर्घृणपणे खून केला.

खून केल्यानंतर प्रणवच्या मित्राने तो खुनाचा व्हिडिओ करून सोशल माध्यमात व्हायरल केला. या घटनेनंतर आरोपीच्या विरोधात प्रणवचे आजोबा रघुनाथ मारुती लोंढे (वय 65 रा. मेदनकरवाडी, ता. खेड, मूळ रा. कान्हूरपठार, ता. पारनेर, जि. अ. नगर) यांनी फिर्याद देऊन चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास चाकणचे पोलीस अधिकारी व अंमलदार करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!